पुढारी वृत्तसेवा
हळदीचे दूध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
हळदीमध्ये ‘कर्क्युमिन’ नावाचा मुख्य घटक असतो, जो शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो.
हे दूध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि पचनक्रियाही सुधारते.
तज्ज्ञांच्या मते, हळदीचे दूध पिण्याची वेळ तुमच्या आरोग्याच्या गरजेवर अवलंबून असते.
सकाळच्या वेळी हळदीचे दूध पिण्याने शरीरातील पित्त ऊर्जा वाढते. वजन घटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकाळी हे दूध लाभदायक ठरते.
ज्या लोकांच्या शरीरात ‘वात’ जास्त असतो किंवा ज्यांना ‘आयबीएस’चा त्रास आहे, त्यांनी सकाळी हळदीचे दूध पिणे फायदेशीर आहे.
‘कफ’ प्रवृत्ती असलेल्या लोकांसाठी रात्रीच्या वेळी कोमट किंवा गरम हळदीचे दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते.
ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही वेळ उत्तम आहे. रात्री हळदीचे दूध प्यायल्याने सांधेदुखी आणि शरीरातील वेदना कमी होतात.