मोहन कारंडे
युरोपसह जगभरातील अनेक विमानतळांवर शनिवारी अचानक मोठा गोंधळ निर्माण झाला. कारण, स्वयंचलित चेक-इन सिस्टीम अचानक ठप्प झाली होती.
सायबर हल्ल्यामुळे ही सिस्टीम बंद पडली आणि लाखो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक उड्डाणे उशिराने झाली तर काही थेट रद्द करावी लागली.
प्रवाशांना चेक-इन साठी लांबच लांब रांगांमध्ये तासंतास उभं राहावं लागलं.
या सायबर हल्ल्यामुळे विमानतळांवर सर्व कामं मॅन्युअली, म्हणजेच हाताने करावी लागली. ही पद्धत युरोपात अनेक वर्षांपूर्वी वापरली जात होती.
ज्या सॉफ्टवेअरवर हा हल्ला झाला, त्याचं नाव 'Muse' आहे.
Muse सॉफ्टवेअर हे एक पॅसेंजर प्रोसेसिंग सिस्टम आहे. हे सॉफ्टवेअर एअरलाईन्स कंपन्यांना एकाच हार्डवेअर सिस्टीमद्वारे सर्व कामं करण्याची सुविधा देतं.
Collins Aerospace या कंपनीने 'Muse' सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ही कंपनी RTX ची उपकंपनी आहे. सायबर हल्लेखोरांनी याच सॉफ्टवेअरला लक्ष्य केलं.
या सायबर हल्ल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेला. अनेक विमानांना उशीर झाला, तर काही विमाने रद्द करावी लागली. त्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला.