पुढारी वृत्तसेवा
डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये हुरडा पार्टीच आयोजन केलं जातं.
शहरातील नागरिकांना थंडीच्या दिवसांत गावरान चव चाखण्यासाठी ही संधीच असते.
महाराष्ट्राच्या अनेक भागात शेतात, रानात हुर्डा पार्टीच आयोजन केलं जातं.
ज्वारीची कोवळी कणस आगीत किंवा शेकोटीवर भाजली जातात. त्यावेळी ज्वारीची कोवळी दाणे बाहेर पडतात त्यालाच हुरडा म्हणतात.
शेतात शेकोटी पेटवून मित्रमंडळी कुटुंबिय यांच्यासोबत हुरडा खाण्याची मजा काही औरच असते.
हुरड्या सोबत शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची किंवा तिळाची चटणी, गुळ, दही, लोणच, बाजरीची भाकरी, वांग्याच भरीत हे जीन्नसही तोंडाची चव वाढवतात आणि पोटही तृप्त करतात.
ज्वारीची कणसे चुलीत भाजून बाहेर पडलेली कोवळी ज्वारीचे दाणे तुपात भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकायचे अन् कोणत्याही चटणीसोबत खायचे.
ज्वारीच्या कोवळ्या दाण्यांमध्ये लोह असते. त्यात कर्बोदकांचे प्रमाणही मुबलक असते. त्यामुळे त्यातून उर्जा मिळते. तसेच लोह, मॅग्नेशियम, कॉपरचे प्रमाणही असते. जे शरीरासाठी आवश्यक आहे.