पुढारी वृत्तसेवा
कारले शरीर थंड ठेवते, निर्जलीकरण (dehydration) टाळण्यास मदत करते.
कारल्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीर थंड व हायड्रेटेड : कारले उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
रक्त शुद्धीकरण व त्वचा : कारले रक्त स्वच्छ करते, ज्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत.
मधुमेह नियंत्रण : कारल्यातील घटक साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
पचन सुधारते : उन्हाळ्यात होणारा अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी कारले उपयुक्त आहे.
अतिसेवन टाळा : रोज जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाचा त्रास, जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात.
काय खाऊ नये : कारल्यासोबत आंबा, दूध, दही, मुळा किंवा भेंडी खाणे टाळावे, यामुळे मळमळ, पोटात जळजळ होऊ शकते.
वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. वाचकांनी आपल्या आरोग्य समस्येत तज्ञांचा सल्ला घ्यावा.