पुढारी वृत्तसेवा
आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की केळी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.
केळ्यात नैसर्गिक फायबर, साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. अशात केळी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास पचनासंबंधी त्रास जाणवू शकतात.
केळे मऊ असले तरी ते पचायला थोडा वेळ घेते. केळ्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केळावर लगेच पाणी प्यायल्याने गॅस्ट्रिक ॲसिडचे संतुलन बिघडते, ज्यामुळे पोटात गॅस आणि जळजळ होऊ शकते.
केळी खाल्ल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्यास शरीराचे तापमान अचानक बदलते, ज्यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
यामुळे पोटात गॅस, अपचन, जडपणा, ॲसिडिटी किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
कोणतेही फळ किंवा केळी खाल्ल्यानंतर साधारण २० ते ३० मिनिटांनी पाणी प्या.
जर तुम्हाला खूप तहान लागली असेल, तर केळे खाण्याआधी १०-१५ मिनिटे पाणी पिऊन घ्यावे.