पुढारी वृत्तसेवा
बदाम आणि दूध या दोन्हीमध्ये झोपेची गुणवत्ता वाढवणारे घटक असतात. दुधातील मेलाटोनिन शरीराला झोपेचे संकेत देते, ज्यामुळे मन शांत होऊन गाढ झोप लागते.
बदामामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते. हे मॅग्नेशियम शरीरातील स्नायूंना आराम देते, ज्यामुळे दिवसभराचा शारीरिक थकवा दूर होतो.
बदामाला 'ब्रेन फूड' म्हटले जाते. यातील व्हिटॅमिन ई आणि रायबोफ्लेविन मेंदूच्या पेशींना निरोगी ठेवतात आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.
रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे दूध प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो. यामुळे सकाळी उठल्यावर फ्रेश आणि उत्साही वाटते.
जर तुम्हाला रात्री उशिरा भूक लागत असेल, तर बदामाचे दूध उत्तम पर्याय आहे. यामुळे पोट भरलेले वाटते आणि तुम्ही अवेळी 'अनहेल्दी स्नॅक्स' खाण्यापासून वाचता.
दूध आणि बदाम हे कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी चे उत्तम स्रोत आहेत. याच्या नियमित सेवनाने हाडे आणि दातांचे आरोग्य सुधारते.
यामध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे रात्री शरीराची झीज भरून निघते. याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर होतो आणि सकाळी चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसते.
कोमट बदामाचे दूध प्यायल्याने पचनसंस्था सुरळीत राहते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.