पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताला महत्व आहे. दिवसाची वेळ कोणत्याही कामासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे सूर्यास्तानंतर नखे किंवा केस कापू नयेत असे म्हटले जाते.
आपल्याकडे अनेक प्रथा परंपरा आहेत. या प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्या पाठिमागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत, ती कोणती ते जाणून घेउयात.
रात्री नखे कापणे, सायंकाळी झाडू मारणे, रात्री नखे, केस कापणे यावरून मोठ्यांकडून टोकले जाते.
वडिलधाऱ्या मंडळींकडून हे सांगण्यापलिकडे कोणते कारण आहे ते जाणून घेउयात.
सुरक्षितता (वैज्ञानिक कारण) : पूर्वी विजेची व्यवस्था नव्हती. रात्री दिव्याच्या प्रकाशात नखे कापताना बोटाला जखम होण्याची किंवा धारदार वस्तू लागण्याची शक्यता असे हे कारण असू शकते.
अस्वच्छता : रात्री नखे कापल्यास ती घरात इतरत्र पडू शकतात, ज्यामुळे घरातील अन्नपदार्थात ती जाण्याची शक्यता असते यामुळे आरोग्याचा धोका होउ शकतो.
धार्मिक कारण : संध्याकाळनंतर लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते, अशा वेळी नखे किंवा केस कापणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात गरिबी येते असे मानले जाते.
नखांचा कडकपणा : नखे ही त्वचेवरचा महत्वाचा भाग आहे. रात्री नखे काढताना त्वचेला जखम होउ शकते. तसेच नखांचे आरोग्य बिघडू शकते. ही सर्वसाधारण माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे इतकाच या स्टोरीचा हेतू आहे.