महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे ईश्वराविषयी काय होते विचार?

पुढारी वृत्तसेवा

आइन्स्टाईन यांचे ईश्वराविषयी विचार – महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी ईश्वराच्या अस्तित्वाबाबत आपले विचार एका पत्रातून व्यक्त केले होते.

१९५४ मध्ये लिहिले होते पत्र – आइन्स्टाईन यांनी १९५४ मध्ये एका पत्रातून देवाविषयीची आपली भूमिका मांडली होती.

वयाच्या ७४ व्या वर्षी व्यक्त केले विचार – हे पत्र लिहिले तेव्हा आइन्स्टाईन यांचे वय ७४ वर्षे होते. त्यांनी हे पत्र जर्मन तत्त्वज्ञाला लिहिले होते.

एरिक गुटकाइंड यांना लिहिले पत्र – जर्मन तत्त्वज्ञ एरिक गुटकाइंड यांना लिहिलेले हे पत्र जर्मन भाषेत होते. त्यात आइन्स्टाईन यांनी ईश्वराविषयीचे आपले विचार स्पष्ट केले होते.

देवावर वैयक्तिक विश्वास नसल्याचे विधान – या पत्रात त्यांनी लिहिले होते, "मी वैयक्तिकरित्या देवावर विश्वास ठेवत नाही."

ईश्वर या शब्दाबाबत मत – आइन्स्टाईन यांनी लिहिले होते, "माझ्यासाठी ईश्वर हा शब्द मानवी दुर्बलतेची अभिव्यक्ती आणि निर्मिती यापलीकडे काहीही नाही."

बायबल आदरणीय असले, तरी ते दंतकथांनी भरलेले आहे, असे आइन्स्टाईन यांचे मत होते. त्याच्या कितीही सूक्ष्म व्याख्या केल्या, तरी माझ्या मतात काहीही बदल होणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

२.९ दशलक्ष डॉलरमध्ये पत्राचा लिलाव – आइन्स्टाईन यांचे हे ऐतिहासिक पत्र २०१८ मध्ये लिलावासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी या पत्राचा तब्बल २.९ दशलक्ष डॉलरमध्ये लिलाव झाला होता.