भारतातील श्रीमंतांचा पैसा कुठे खर्च होतो? रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

भारतातील श्रीमंत कुटुंबांची संख्या २०२१ पासून दुपटीने वाढून ८,७१,७०० इतकी झाली आहे, असे मर्सिडीज-बेंझ हुरुन इंडिया वेल्थ रिपोर्ट २०२५ मध्ये नमूद करण्यात आले आहे.

मुंबईत १,४२,००० श्रीमंत कुटुंब आहेत. तर महाराष्ट्र १,७८,६०० करोडपती कुटुंबांसह आघाडीवर आहे. आता श्रीमंतांचा भारतातील पैसा कुठे खर्च होतो? असा तुम्हालाही प्रश्न पडलाय का?

पर्यटन, शिक्षण आणि मनोरंजन

सुमारे ६० टक्के श्रीमंत कुटुंबे दरवर्षी १ कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च करतात. त्यातील मोठा वाटा पर्यटन, शिक्षण व मनोरंजन यावर खर्च होतो.

स्टॉक्स, रिअल इस्टेट, सोने गुंतवणुकीबाबत शेअर

बाजार, स्थावर मालमत्ता आणि सोनं हेच आवडीची क्षेत्रे कायम आहेत.

डायमंड आणि दागिने ७५ टक्के श्रीमंत

नैसर्गिक हिरे पसंत करतात. भारतात तनिष्क, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर टिफनी अॅण्ड कंपनी आघाडीवर आहे. ऑनलाईन दागिने खरेदीसाठी कॅरेंटलेन सर्वोच्च आहे.

५० टक्क्यांपेक्षा जास्त श्रीमंतांकडे दोन किंवा अधिक गाड्या आहेत. ३ ते ६ वर्षांनी आपली गाडी बदलण्याकडे कल आहे, तर ४० टक्के लोक ६ वर्षांपेक्षा जास्त गाडी वापरतात.

हॉबी आणि फिटनेसः ४५ टक्के श्रीमंतांसाठी प्रवास हा आवडता छंद, त्यापाठोपाठ वाचन आणि कुकिंग. योगासन (२७ टक्के) सर्वात लोकप्रिय फिटनेस अॅक्टिव्हिटी आहे.

विदेश शिक्षण

परदेशी शिक्षणासाठी सर्वाधिक अमेरिका (१९ टक्के) पसंत, त्यानंतर यूके (१४ टक्के). मात्र ४२ टक्के श्रीमंत पालक आपल्या पाल्याला भारतातच शिक्षण द्यायची इच्छा ठेवतात.

शहरांचा संख्यात्मक आढावा

महाराष्ट्रात १,७८,६०० श्रीमंत कुटुंबं असून यातील १,४२,००० मुंबईत राहतात. दिल्लीमध्ये ६८,२००, तर बंगळुरूमध्ये ३१,६०० श्रीमंत घरं आहेत.

हात घड्याळं आणि बॅण्डेड अॅक्सेसरीज

पुरुषांसाठी सर्वाधिक गिफ्ट रोलेक्स घड्याळ, तर महिलांकरिता दागिने आणि मुलांसाठी खेळणी असा कल दिसतो. लक्झरी अॅक्सेसरीजसाठी सर्वोच्च पसंतीस पात्र.