पुढारी वृत्तसेवा
वजन कमी करण्याचा विचार करताय? मग जिमपेक्षा तुमच्या डाएटवर लक्ष द्या.
आपल्याला अनेकदा वाटते की थोडेसे गोड किंवा थोडे तळलेले खाल्ल्याने काही फरक पडणार नाही, पण याच लहान चुका आपला मेटाबॉलिज्म मंदावतात.
जर तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारातून काही गोष्टी पूर्णपणे वगळल्या पाहिजेत.
काही पदार्थ तुमचे वजन कमी होऊ देत नाहीत, मग तुम्ही कितीही व्यायाम केला तरीही. जाणून घेऊया या पदार्थांबद्दल.
साखर वजनाचा सर्वात मोठा शत्रू. साखरेत फक्त कॅलरीज असतात, पोषण नाही. ही शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया थांबवते.
सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेट बंद ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असते. त्याऐवजी नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्या.
मैदा टाळा. मैद्यात फायबर नसते, त्यामुळे तो पचनक्रिया मंदावतो आणि पोटाचा घेरा वाढवतो.
तळलेले आणि जंक फूड : या पदार्थांमध्ये 'ट्रान्स फॅट' आणि 'सॅच्युरेटेड फॅट'चे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे वजन वाढते. पिझ्झा, पास्ता, व्हाईट ब्रेड, बिस्किटे, समोसे टाळावे.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात 'वॉटर रिटेंशन' होते, ज्यामुळे शरीर फुगलेले (Bloated) दिसते.
पाकीटबंद पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात. पाकीटबंद सूप, रेडी-टू-ईट मील्स, प्रोसेस्ड मीट टाळावे.
योग्य आहार आणि नियमित व्यायामच तुम्हाला फिट बनवू शकतो.