Mens Fertility: कंबरेला टाईट बेल्ट घालणे पडेल महागात... प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम

Anirudha Sankpal

अनेक पुरुष पॅंटची फिटिंग किंवा फॅशनसाठी बेल्ट वापरतात, परंतु काहींना अतिशय घट्ट (टाइट) बेल्ट बांधण्याची सवय असते.

दीर्घ काळापर्यंत टाइट बेल्ट वापरल्यामुळे पाठीच्या हाडावर (मणक्यावर) वाईट परिणाम होतो आणि कंबरदुखीची समस्या उद्भवू शकते.

घट्ट बेल्ट बांधण्याच्या चुकीच्या सवयीमुळे शरीरात सांधेदुखीची (जॉइंट पेन) समस्या देखील होऊ शकते.

संशोधनानुसार, लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी कसून बेल्ट बांधल्यास त्याचा अन्ननलिकेवर थेट ताण पडतो.

या कारणामुळे अन्ननलिकेवर दबाव आल्याने पचनक्रिया बिघडणे आणि अपचनासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

घट्ट बेल्ट बांधण्याच्या सवयीमुळे पुरुषांच्या आरोग्यावर आणि विशेषतः फर्टिलिटीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, घट्ट बेल्ट बांधल्याने कंबरेच्या आसपासचे तापमान वाढते, ज्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो.

म्हणूनच आरोग्याच्या या गंभीर समस्या टाळण्यासाठी घट्ट बेल्ट बांधण्याची सवय त्वरित बदलणे अत्यंत गरजेचे आहे.

येथे क्लिक करा