Watermelon: कलिंगडापेक्षा त्याच्या बिया आहेत जास्त गुणकारी! हृदयविकारासह 'या' ५ समस्या होतील दूर
पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात अनेक रसाळ फळे बाजारात मिळतात. त्या फळांचा आहारात समावेश करून तुम्हाला या ऋतूमध्ये स्वत:ला निरोगी ठेवता येते.
यातील महत्त्वाचे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगड उन्हाळ्यात अनेक आरोग्यविषयक समस्यांपासूनही दूर ठेवते.
मानसिक आरोग्यासाठीही कलिंगड खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, केवळ कलिंगडचं नाही तर त्याच्या बियादेखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
त्यामुळे कलिंगडातील बिया खाऊन फेकण्यापूर्वी त्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या.
हृदय निरोगी राहते
कलिंगडाच्या बिया हृदयासाठीही खूप फायदेशीर असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.
पचन संस्था सुधारते
कलिंगडाच्या बियांचे सेवन केले तर पचनसंस्थेला खूप फायदा होतो. पचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर कलिंगडाच्या बियांचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरेल.
वजन कमी करण्यास प्रभावी
वजन कमी करायचे असेल तर त्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयोगी पडतात. या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
हाडे मजबूत होतात
हाडांच्या मजबुतीसाठीही कलिंगडाच्या बिया खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले ओमेगा 3, फॅटी अॅसिड, प्रथिने, झिंक, फोलेट, पोटॅशियम, कॉपर यामुळे हाडे मजबूत होतात.
त्वचा तुकतुकीत होते
कलिंगडाच्या बिया त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. या बिया बारीक करून चेहर्यावर लावल्यास त्वचा चमकदार होते. शिवाय चेहर्यावर एक लकाकी येते.