Foot Signs You Shouldn’t Ignore | पायांचे 'हे' संकेत दुर्लक्ष करू नका; वेळीच सावध व्हा

पुढारी वृत्तसेवा

पायांत सूज येणे आणि मुंग्या येणे हे डायबिटीज (Diabetes) ची प्राथमिक लक्षणे असू शकतात.

वारंवार पाय आणि घोट्यात सूज येत असेल किडनीची समस्या असू शकते.

पायात सतात जळजळ आणि विजेसारख्या तीव्र वेदना होत असतील तर नसांची समस्या (Nerve Problem) असू शकते.

नसा फुगणे आणि पाय जड वाटणे व्हेरिकोज वेन्स (Varicose Veins) ची लक्षणे आहेत.

लालसरपणा, सूज आणि पायात उष्णता जाणवत असल्यास संसर्ग / इन्फेक्शन झाल्याचे म्हणता येईल.

Foot | Canva

अंगठ्यामध्ये अचानक तीव्र वेदना होत असेल तर गाउट (Gout) चा प्रकार असू शकतो.

सकाळी उठताना टाचेत तीव्र वेदना होणे ही प्लांटर फॅसिटिस (Plantar Fasciitis) ची लक्षणे आहेत.

पाय थंड पडणे किंवा निळे पडणे ही हृदयविकार (Heart Disease) असल्याचे लक्षण असू शकते.

Foot Health Indicators | (Canva Photo)

संधिवातच्या आजारात सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि कडकपणा येणे.

फंगल इन्फेक्शनमुळे (Fungal Infection):खाज सुटणे, दुर्गंधी येणे, खपल्या निघणे आणि नखे खराब होऊ शकतात.

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता (Vitamin Deficiency) असल्यास टाच फाटणे, नखे तुटणे आणि सतत थकवा जाणवणे ही लक्षणे दिसतात.

येथे क्लिक करा...