पुढारी वृत्तसेवा
हीटवेव्हपासून बचावासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा!
टरबूज (Watermelon) नैसर्गिक कूलर
यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, शरीर हायड्रेट ठेवते. शरीराला थंडावा देते.
काकडी (Cucumber)
काकडी शरीराला थंडावा देते आणि पचन सुधारते. याचा वापर सॅलेड स्वरूपात करू शकता.
दही (Curd)
पोटासाठी सुपरफूड आहे. हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे. जे पचन चांगलं ठेवतं. शरीर थंड राहते.
पुदीना (Mint)
पुदीना शरीराला थंडावा देते. याचा वापर चटणी, सॅलेड किंवा सरबतमध्ये करू शकतो.
नारळ पाणी (Coconut Water)
नारळ पाणी शरीरासाठी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइटचे काम करते. यामुळे घामाने गेलेले मिनरल्स ते भरून काढते.
ताक (Buttermilk)
ताक हे हलकं आणि पचायला सोपं असतं, उन्हाळ्यात पोट थंड ठेवण्यासाठी रोज प्यायल्यास खूप फायदेशीर.
हिरव्या पालेभाज्या (Leafy Greens)
हिरव्या पालेभाज्या पोषणाचा खजिना आहेत. शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स देतात.
सिट्रस फळे (Citrus Fruits)
लिंबू, संत्रे,मोसंबी सारखी फळे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. जे इम्युनिटी वाढवतात. शरीर फ्रेश ठेवतात.
बेरी (Berries)
स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीसारखी फळे अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतात. ही फळे शरीराला ताजेतवाने आणि सक्रिय ठेवण्यास मदत करतात.
काय टाळाल?
तळलेलं, मसालेदार आणि जास्त कॅफिन टाळा – डिहायड्रेशन वाढू शकतं.