परफेक्ट चहा बनवायचा आहे? आधी दूध की पाणी? जाणून घ्या खास फॉर्म्युला!

पुढारी वृत्तसेवा

चहाची खरी चव छोट्या गोष्टीत

चहा बनवताना दूध आधी घालायचे की पाणी, यावरच चहाचा सुगंध आणि चव अवलंबून असते.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

खमंग आणि सुगंधी चहासाठी सर्वप्रथम पाणी उकळणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

मसाल्यांचा अर्क नीट उतरतो

उकळत्या पाण्यात चहापत्ती, आले, वेलची किंवा लवंग घातल्यास त्यांचा स्वाद आणि सुगंध चांगला बाहेर येतो.

४-५ मिनिटे उकळू द्या

मसाले आणि चहापत्ती घातलेले पाणी मंद आचेवर काही मिनिटे उकळल्याने चहा अधिक कडक आणि चविष्ट बनतो

नंतर दूध घाला

पाणी चांगले उकळल्यानंतर आवश्यकतेनुसार दूध घातल्यास चहा गडद, सुगंधी आणि स्वादिष्ट होतो.

कडक चहासाठी खास टिप

आले, वेलची आणि लवंग कुटून पाण्यात घातल्यास मसाल्यांचा अरोमा अधिक प्रभावीपणे चहात मिसळतो.

आधी दूध घातले तर?

दूध आधी घातल्याने चहा खराब होत नाही, पण मसाल्यांचा आणि चहापत्तीचा फ्लेवर तुलनेने सौम्य राहू शकतो.

साखर कधी घालावी?

साखर पाण्यासोबत किंवा दूध घातल्यानंतरही घालू शकता. दोन्ही पद्धतींनी चवीवर विशेष फरक पडत नाही.

दूध-पाण्याचे योग्य प्रमाण

दोन कप चहासाठी १ कप दूध आणि १.५ कप पाणी हे प्रमाण संतुलित, कडक आणि रुचकर चहासाठी उत्तम मानले जाते.