पुढारी वृत्तसेवा
आहारात करा बदल –
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा.
तळलेले पदार्थ टाळा –
जास्त कॅलरी असलेले तळलेले पदार्थ, मिठाई आणि पॅकेज्ड फूडचे सेवन कमी करा.
ताटात भाज्यांचा समावेश करा –
जेवणाच्या ताटातील अर्धा भाग भाज्यांनी भरा. शक्य असल्यास पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राइस निवडा.
साखर आणि मैद्यापासून दूर राहा –
साखर, मैद्याचे पदार्थ, पांढरी ब्रेड आणि बिस्किटे यांचे सेवन मर्यादित ठेवा.
पुरेसे पाणी प्या –
दिवसभरात साधारण ८ ते १० ग्लास पाणी प्या. शरीराला हायड्रेटेड ठेवणे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.
पुरेशी झोप घ्या –
दररोज ७ ते ९ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. अपुऱ्या झोपेमुळे भूक आणि वजनावर परिणाम होऊ शकतो.
तणाव कमी करा –
मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, दीर्घ श्वसन आणि आवडत्या छंदांसाठी वेळ काढा.
दैनंदिन हालचाल वाढवा –
नियमित व्यायाम शक्य नसल्यास थोडे चालणे, सायकल चालवणे आणि लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करणे यांसारख्या सवयी अंगीकारा.