Shivani Badadhe
पावसाळ्यात भिंतींना ओलावा येणे ही खूप सामान्य समस्या आहे.
ओलाव्यामुळे भिंतींवर डाग पडतात आणि दुर्गंधीही येऊ शकते.
अनेकांना प्रश्न पडतो की, भिंतींवरील ओलावा कसा रोखायचा? चला, सोपे उपाय जाणून घेऊया.
घरात हवा खेळती राहील अशी व्यवस्था ठेवा, त्यामुळे ओलावा कमी होतो.
भिंतीतून पाणी झिरपत असेल तर ते त्वरित दुरुस्त करून घ्या.
भिंती कोरड्या ठेवा आणि गरज असल्यास वॉटरप्रूफ पेंट वापरा.
खोलीत जास्त ओलावा असल्यास एक्झॉस्ट फॅन किंवा डीह्यूमिडिफायरचा वापर करा.
फर्निचर भिंतीला अगदी चिकटवून ठेवू नका. थोडे अंतर ठेवा, त्यामुळे हवा खेळती राहते.
भिंतींवर काळी बुरशी किंवा डाग दिसू लागल्यास ते लगेच स्वच्छ करा.