Namdev Gharal
चालणे हा 'लो-इम्पॅक्ट' व्यायाम आहे, जो सांध्यांसाठी सुरक्षित मानला जातो. तसेच हृदयासाठीपण अतिशय उपचुक्त, पण काही परिस्थितीत तो त्रासदायक ठरू शकतो
आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दररोज ३० ते ४५ मिनिटे मध्यम गतीने चालणे आरोग्यासाठी पुरेसे आहे किमान 5 हजार स्टेप्स
पण दररोज डांबरी किंवा सिमेंटच्या कडक रस्त्यावर खूप जास्त अंतर चालण्यास सुरुवात केल्यास गुडघ्यातील कूर्चा (Cartilage) आणि अस्थिबंधनांवर (Ligaments) ताण येतो.
दुसरी गोष्ट म्हणजे चुकीची पादत्राणे, पातळ तळवे असलेले किंवा जुने शूज घालून चालल्याने जमिनीचा धक्का थेट गुडघ्यांपर्यंत पोहोचतो. यासाठी योग्य पादत्राणे हवीत
माती किंवा गवतावर चालताना जमीन धक्के शोषून घेते. मात्र, सिमेंटच्या रस्त्यावर हे धक्के गुडघे आणि घोट्यांना सहन करावे लागतात.
कठोर पृष्ठभाग: सिमेंट किंवा डांबरी रस्त्यावर वेगाने चालण्यापेक्षा माती किंवा गवतावर चालणे गुडघ्यांसाठी जास्त सुरक्षित असते.
तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ कडक रस्त्यावर वेगाने चालल्यामुळे गुडघ्यातील गादीची (Cartilage) झीज होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे भविष्यात सांधेदुखी होऊ शकते.
जर तुम्ही डांबरी रस्त्यावरच चालावे लागते दुसरा ऑपश्न नसेल तर तर साधे चप्पल किंवा सँडल वापरू नका. चांगल्या 'कुशनिंग'चे वॉकिंग शूज वापरणे गरजेचे ठरते.
शक्य असल्यास बागेतील मातीचा रस्ता, गवतावर किंवा सिंथेटिक ट्रॅकवर चालावे. हे गुडघ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात सुरक्षित मानले जाते.