नियमित चालायलाच हवे... कृती एक फायदे अनेक!
पुढारी वृत्तसेवा
नियमित चालण्याच्या व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
File Photo
दररोज चालल्याने शरीरातील कॅलरी खर्च होतात. वजन संतुलित ठेवण्यास मदत होते.
File Photo
काही ठराविक अंतर तुम्ही नियमित चालल्यास इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
हाडे व सांधे मजबूत होतात. चालण्याने सांध्यांमध्ये लवचिकता टिकून राहते. हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो.
चालण्याने तणाव, चिंता आणि डिप्रेशन कमी होण्यास मदत होते. मानसिक आरोग्य सुधारते
जेवणानंतर चालल्यास पचनक्रिया सुरळीत होते. पचनशक्ती सुधारते. गॅस, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
चालताना श्वासोच्छ्वास वाढतो. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
नियमित चालणाऱ्यांना गाढ झोप लागते. झोपेची गुणवत्ता सुधारते.
चालणाऱ्या लोकांचे एकूण मृत्यूचे प्रमाण कमी असते, म्हणजेच दीर्घायुष्य मिळण्याची शक्यता अधिक असते.
येथे क्लिक करा.