Vitamin D: शरीरात व्हिटॅमिन D कमी झाले तर दिसतात ही ६ लक्षणे

पुढारी वृत्तसेवा

व्हिटॅमिन डी आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि मूड नियंत्रित करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया योग्यरित्या चालण्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी असणे गरजेचे आहे.

स्नायू दुखणे

व्हिटॅमिन डी स्नायूंना मजबूत आणि निरोगी ठेवते. याची कमतरता असल्यास स्नायूंमध्ये वेदना किंवा थकवा जाणवू शकतो.

जास्त खाण्याची इच्छा

व्हिटॅमिन डी कमी असल्यास शरीराला पूर्ण समाधान मिळत नाही आणि त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते.

थकवा

नेहमीच थकल्यासारखे किंवा अशक्त वाटत असेल, तर व्हिटॅमिन डीची कमतरता यामागे असू शकते.

मन उदास होणे

व्हिटॅमिन डी शरीरातील ‘सेरोटोनिन’ निर्मितीत मदत करते, जे आपली मनःस्थिती नियंत्रित ठेवते. त्यामुळे कमतरता असल्यास मन उदास राहू शकते.

झोपेच्या तक्रारी

व्हिटॅमिन डी कमी झाल्यास मेंदूतील झोप आणि जागेपणाचा क्रम बिघडतो, त्यामुळे झोप नीट लागत नाही.

गरगरणे

जर तुम्हाला चक्कर येत असेल तर हे देखील व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते.