पुढारी वृत्तसेवा
ही समस्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये दिसून येत आहे.
डी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कमी वयातच हाडांमध्ये वेदना होणे, संधिवात यांसारख्या समस्यांना सामोसे जावे लागते.
शहरी जीवनशैली, घरे-कार्यालयांमध्ये जास्त वेळ घालवणे, सनस्क्रीनचा अतिवापर, पोषणाची कमतरता ही प्रमुख कारणे...
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज हलका सूर्यप्रकाश घेणे, प्रथिनयुक्त आहारासोबत व्हिटॅमिन-डी पदार्थांचा आहारात समावेश गरजेचा.
व्हिटॅमिन-डी शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन-डी रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी, मेंदूच्या तसेच मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियमचा योग्य वापर होऊ शकत नाही, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात.
भारतातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिला-वृद्धांमध्ये हाडे कमकुवत होण्याची समस्या दिसून येते.