शरीराच्या योग्य विकासासाठी विविध जीवनसत्त्वांची आवश्यकता असते, 'बी-६' हे त्यापैकीच एक महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे..बी-६ जीवनसत्त्वाला 'पायरिडॉक्सिन' या नावानेही ओळखले जाते. हे 'बी-कॉम्प्लेक्स' समूहाचा एक मुख्य भाग आहे..बी १२ या जीवनसत्त्वाचाही तो एक भाग असल्यामुळे गर्भवती महिलांच्या आणि गर्भाच्या निरोगी वाढीसाठी हे जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक असते..हे जीवनसत्त्व आहारातील पोषक घटकांचे योग्य प्रकारे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते..आहारातील चरबी आणि प्रथिनांच्या पचनप्रक्रियेत याची भूमिका महत्त्वाची असते..केस, त्वचा, यकृत आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'व्हिटॅमिन बी' अत्यंत महत्त्वाचे आहे..संशोधनानुसार, व्हिटॅमिन बी-६ मुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यासही मदत होते..स्त्रियांमध्ये मासिक पाळीपूर्वी जाणवणारी लक्षणे (उदा. ओटीपोटात दुखणे, कंबरदुखी) कमी करण्यासाठी बी-६ जीवनसत्त्व फायदेशीर ठरते.