पुढारी वृत्तसेवा
हाता-पायांना वारंवार मुंग्या येतात का? कोणतेही कारण नसताना असा त्रास होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका!
तज्ज्ञांच्या मते, हाता-पायांना वारंवार मुंग्या येण्यामागे 'व्हिटॅमिन बी १२'ची कमतरता हे मुख्य कारण असू शकते.
व्हिटॅमिन बी १२ नसांचे संरक्षण करणारे 'मायलिन' हे आवरण निरोगी ठेवण्यास मदत करते.
नसा कमजोर झाल्यामुळे हाता-पायांमध्ये मुंग्या येणे आणि अवयव सुन्न पडणे असा त्रास होतो.
या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे सतत अशक्तपणा जाणवतो आणि शरीराचा समतोल राखण्यात अडचण येते.
दीर्घकाळ 'बी १२'ची कमतरता राहिल्यास नसांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
दूध, दही, पनीर आणि चीज यामध्ये व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण उत्तम असते.
अंड्याच्या पिवळ्या भागात (बल्क) व्हिटॅमिन बी १२ चांगल्या प्रमाणात आढळते.
त्रास जास्त असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!