पुढारी वृत्तसेवा
आजच्या धावपळीच्या जीवनात, आपले डोळे सतत मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि टॅब्लेटच्या स्क्रीनशी जोडलेले असतात.
ज्यामुळे लहान वयातच द़ृष्टी कमी होणे ही समस्या सामान्य झाली आहे.
तुम्हाला कधी असे जाणवले आहे का, की तुमचे डोळे लवकर थकून जातात किंवा रात्री धुसर दिसू लागले आहे?
ही लक्षणे अनेकदा सतत स्क्रीन पाहणे, अपुरी झोप आणि चुकीच्या आहारामुळे दिसतात.
डोळ्यांच्या द़ृष्टीसाठी काही जीवनसत्त्वे अत्यंत आवश्यक असतात. जेव्हा शरीरात त्यांची कमतरता होते, तेव्हा द़ृष्टी कमी होऊ लागते.
यापैकीच एक आहे ‘व्हिटॅमिन ए’, शरीरात याची कमतरता झाल्यास व्यक्ती अंधत्वाच्या आजाराने पीडित होऊ शकते.
जेव्हा एखाद्याला रात्रीच्या वेळी पाहण्यात अडचण येते (रातांधळेपणा), तेव्हा ती ‘व्हिटॅमिन ए’ची कमतरता असू शकते.
‘व्हिटॅमिन ए’च्या कमतरतेमुळे कॉर्निया गरजेपेक्षा जास्त कोरडा होतो, ज्यामुळे डोळ्यांसमोर धुसर थर तयार होऊ लागतो. यामुळे दिसणे कमी होते.
गाजर, रताळे, भोपळा , हिरव्या पालेभाज्या (उदा. पालक) आणि लाल शिमला मिरची अशा भाज्या ‘व्हिटॅमिन ए’चा उत्तम स्रोत असतात.
आंबा, पपई, जर्दाळू , टरबूज आणि खरबुजा यामधूनही हे जीवनसत्त्व मिळते. दूध, अंडी आणि मासे यांच्या सेवनानेही ‘व्हिटॅमिन ए’ मिळते.