Kadalekalu Ganesha : विजयनगरच्या वैभवाची साक्ष; ‘कडलेकाळू गणेश’ मूर्ती

पुढारी वृत्तसेवा

विजयनगर साम्राज्याच्या राजधानी हम्पीच्या भूमीत एक अशी भव्य गणेश मूर्ती विराजमान आहे

दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या अखंड दगडी (Monolithic) गणेश मूर्तींपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.

ही मूर्ती तत्कालीन शिल्पकला आणि अभियांत्रिकी कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

हेमकुटा टेकडीच्या उतारावर वसलेली ही गणेश मूर्ती पर्यटकांचे आणि भाविकांचे लक्ष वेधून घेते.

ही मूर्ती सुमारे 15 फूट (4.5 मीटर) उंच असून ती एकाच विशाल दगडातून कोरण्यात आली आहे.

भव्य आकार आणि शांत मुद्रा पाहणार्‍याच्या मनात श्रद्धेची भावना निर्माण करते.

कन्नड भाषेत ‘कडलेकाळू’ याचा अर्थ ‘हरभर्‍याचा दाणा’ किंवा ‘फुटाणा’ असा होतो.

या मूर्तीचे पोट हरभर्‍याच्या दाण्याप्रमाणे गोल आणि विशाल असल्यामुळे तिला हे नाव पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.