Namdev Gharal
व्हिक्टोरिया क्राउन पिजन हे जगातील सर्वात मोठे कबूतर ठरते, कारण याचा आकार, हे हवेत जास्त उडत नाही पण जमीनीवर चालताना मोठ्या थाटात चालते
निळसर पंख, राजेशाही चाल आणि डोक्यावर मुकुटासारखी पिसांची रचना—व्हिक्टोरिया क्राउन पिजन (Victoria Crowned Pigeon) पाहताच लक्ष वेधून घेतो
हा पक्षी केवळ कबूतर नसून, निसर्गाची एक “रॉयल कलाकृती” आहे. कारण हा दिसायला राजेशाही दिसतो
याची उंची साधारण 65–75 सेमी व लांबी सुमारे 73–75 सेमी असते जवळपास दिड फूट उंच व २ फूट लांब असते, याच्या पंखाचा फैलाव हा अंदाजे 70–80 सेमी इतका असतो
सामान्य कबूतरांपेक्षा हा पक्षी खूपच मोठा दिसतो. याचे वजन २ ते 3.5 किलोग्राम असते सामान्य कबूतर हे फक्त 300–400 ग्रॅम इतक्या वजनाचे असते त्यामुळे हा १० पट मोठा ठरतो
हे कबूतर प्रामुख्याने न्यू गिनी (Papua New Guinea) आणि आसपासची बेटे, उष्णकटिबंधीय जंगले, दलदलीचे भाग याठिकाणी आढळतो.
याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याच्या डोक्यावरील मुकूट, निळ्या रंगाचा लेससारखा मुकुटाच्या टोकाला पांढरे ठिपके त्याला राजेशाही लूक देतात.
याचा रंग गडद निळा किंवा निळसर-राखाडी असतो तर छातीवर तपकिरी-लालसर रंगाची छटा असते
हा पक्षी जास्त हवेत उडत नाही पण चालताना मात्र मोरासारखा थाटात चालतो