पुढारी वृत्तसेवा
जेव्हा व्हिटॅमिन B12 ची कमतरता जाणवते, तेव्हा शाकाहारी लोकांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा असतो की त्यांनी नेमके काय खावे?
कारण, हे जीवनसत्व प्रामुख्याने मांस आणि मांसाहारी पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात असते.
मात्र, असे काही शाकाहारी पदार्थ आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रमाणात आढळते.
व्हिटॅमिन B12 आपल्या नसा निरोगी ठेवण्यासाठी, लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी काम करते. जाणून घेऊया याची कमतरता कशी दूर करावी?
गायीचे दूध: एक ग्लास गायीच्या दुधात सुमारे १.१ मायक्रोग्राम B12 असते, जे तुमच्या दैनंदिन गरजेच्या सुमारे ४५ टक्के पूर्ण करते.
दही: दह्यातील 'प्रोबायोटिक' गुणधर्म पचन सुधारण्यास आणि B12 शोषून घेण्यास मदत करतात. एका वाटी दह्यामध्ये सुमारे ०.६ ते १.० मायक्रोग्राम B12 आढळते.
पनीर: १०० ग्रॅम पनीरमध्ये सुमारे ०.८ मायक्रोग्राम व्हिटॅमिन B12 आणि १८-२० ग्रॅम प्रोटीन असते. मात्र, पनीर शुद्ध असावे, भेसळयुक्त नसावे.
फोर्टिफाइड तृणधान्ये: फोर्टिफाइड शुगर-फ्री धान्यांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन B12 मोठ्या प्रमाणात असते. नियमितपणे याचे सेवन केल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते.
भाज्या: पालक, बीट आणि गाजर यामध्ये देखील व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रमाणात आढळते. शाकाहारी लोक या गोष्टींच्या सेवनाने व्हिटॅमिनची कमतरता दूर करू शकतात.