Free Medical Treatment : १० लाखांपर्यंत फ्री उपचार! ‘वय वंदना कार्ड’ काढायचं कसं? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

वय वंदना कार्ड काढले का?

७० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी सरकारची मोठी योजना — आता आरोग्याची चिंता संपली!

१० लाखांचे आरोग्य कवच!

प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाला वर्षाला तब्बल ₹१० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार.

उत्पन्नाची अट नाही

ही योजना सर्वांसाठी खुली आहे — उत्पन्न कितीही असले तरी लाभ मिळणार.

कोणते आजार कव्हर?

कॅन्सर, किडनी, न्यूरोलॉजिकल आजारांसह अनेक गंभीर आजारांचा समावेश.

महागड्या शस्त्रक्रिया मोफत

हृदयविकार, बायपास, अँजिओप्लास्टी, गुडघा प्रत्यारोपण, मोतीबिंदू ऑपरेशनही पूर्णपणे फ्री.

औषधे आणि तपासण्या देखील फ्री

रक्ततपासणीपासून ते महागड्या स्कॅनपर्यंत सर्व खर्च सरकार उचलणार.

कॅशलेस आणि पेपरलेस सुविधा

रुग्णालयात भरती झाल्यावर एकही रुपया द्यावा लागणार नाही — पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन.

सरकारी + खासगी हॉस्पिटल्समध्ये लागू

योजनेत समाविष्ट असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्येही कार्ड वैध.

आयुष्मान vs वय वंदना

  • आयुष्मान कार्ड: ₹५ लाख (कुटुंबासाठी)

  • वय वंदना कार्ड: ₹१० लाख (ज्येष्ठांसाठी स्वतंत्र)

घरबसल्या कार्ड कसे काढाल?

Ayushman App डाउनलोड करा → लॉगिन करा → OTP टाका → वय 70+ निवडा → आधार लिंक करा → e-KYC पूर्ण करा → कार्ड डाउनलोड करा