Vata Dosha | शरीरातील वात वाढला आहे,कसे ओळखाल? उपाय काय करावेत!

पुढारी वृत्तसेवा

माणसामध्ये प्रामुख्याने वात कफ व पित प्रकारची लोक आढळतात. यात वात प्रकृतीच्या लोकांना हाडांसबधी समस्या खूप असतात

जर तुमच्या शरिरात वात वाढला असेल तर शरीर तुम्हाला काही लक्षण दाखवते हे तुम्ही ओळखून त्‍यावर उपाय करणे गरजेचे आहे

यातील पहिले लक्षण म्हणजे हाडांमधून वारंवार कट - कट असा आवाज येणे, हाडे मोडताना येतो तसाच हा आवाज पट बसता उठता प्रत्‍येक सांध्यातून आवाज येणे म्हणजे वात प्रकोप

दुसरे लक्षण म्हणजे सतत थकवा येणे, सकाळी उठले तरी फ्रेश न वाटणे, उत्‍साह येत नाही हे वाताचेच लक्षण असते

सांध्यांमध्ये कडकपणा येणे, सूज किंवा वेदना होणे, त्वचा कोरडी पडणे, भेगा पडणे किंवा खाज सुटणे. हे वाताचे लक्षण असते

तसेच तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता (Constipation) आणि पोट फुगणे.यासह पायमध्ये गोळे येतात व कंबरदुखी आहे

उपाय काय करता येतील, वेळेवर जेवणे किंवा, अति प्रमाणात धावपळ किंवा शारीरिक श्रम टाळावे

स्निग्ध पदार्थ: आहारात तूप, तीळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचा समावेश करा. जिरे, ओवा, हिंग, आले आणि लसूण यांचा वापर जेवणात वाढवा.

कच्ची फळे, भाज्या, कोल्ड ड्रिंक्स आणि फ्रिजमधील थंड पाणी टाळावे हे वात वाढण्यास कारणीभूत असतात

गरम तीळाच्या तेलाने शरीराला मालिश करा, यामुळे वात लवकर शांत होतो. पोट फुगल्यास किंवा गॅस झाल्यास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग आणि ओवा टाकून प्या.

सांधेदुखी असल्यास पिशवीने गरम शेक घ्या. जेवणाची वेळ निश्चित करा, यामुळे पचन सुधारते आणि वात नियंत्रणात राहतो.