Namdev Gharal
रिक्षा भोवती एक संस्कृती वसलेली आहे. भारतात मुख्यता पारंपरिक काळी-पिवळी, किंवा हिरवी पिवळी ऑटो रिक्षा वापरली जाते. रिक्षामध्ये हातरिक्षा , ऑटो, सायकलरिक्षा असे विविध प्रकार आहेत.
नायजेरियातील सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरली जाणारी रिक्षा केके नापेक ही रिक्षा भारतीय बनावटीचीच आहे.
चीनमध्ये वापरली जाणारी पारंपरिक सायकल रिक्षा, जी मानवी शक्तीवर चालते.
मादागास्कर या आफ्रीकन देशात पुस - पुस नावाने रिक्षाला संबोधले जाते.
बांगलादेशमध्ये बहुतेक ठिकाणी सायकल रिक्षाच चालवली जाते
विविध आफ्रिकन देशांमध्ये भारतीय बनावटीच्याच फक्त वेगळ्या रंगाच्या रिक्षा वापरल्या जातात
भारतातील कोलकता शहरामध्ये हाताने ओढली जाणारी पारंपरिक हातरिक्षा आढळते. पण त्याला शोषणाचे प्रतिक मानले जाते.
श्रीलंकेमध्ये अनेक पर्यटकांसाठी विविधरंगी रिक्षाचा वापर केला जातो.
थायलंडमध्ये साधारण पर्यटन स्थळी वापरली जाणारी पारंपरिक रिक्षा म्हणजे टूकटूक