Vasubaras : वसुबारसच्या दिवशी विशेष काय करावे?

पुढारी वृत्तसेवा

वसुबारस हा दीपावलीचा प्रारंभ मानला जातो. या दिवशी गोमातेचे पूजन केले जाते.

भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचे स्थान दिलेले आहे. गोमातेच्या पूजनाने घरात सुख, समृद्धी आणि मांगल्य नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

वसुबारसच्या सायंकाळी आकाश कंदिलाची पूजा करून तो घरास बांधण्याची परंपरा आहे.

आकाश कंदील हा प्रकाश, आनंद आणि मांगल्याचे प्रतीक आहे.

या दिवशी विशेष काय करावे ?

गोमातेचे पूजन करावे. गायीला गूळ व चारा अर्पण करावा.

सायंकाळी घरातील देवघरात दिवा लावावा.

सायंकाळी आकाश कंदिलाची विधिवत पूजा करून तो घराच्या दर्शनी भागात बांधावा.

आकाश कंदील प्रज्वलित करून दीपावलीचे स्वागत करावे.