Vastu Tips : घरात पितरांचे फोटो नेमके कुठे लावावेत? जाणून घ्या ९ महत्त्वाच्या गोष्टी

पुढारी वृत्तसेवा

वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. घरातील प्रत्येक वस्तू वास्तुनुसार योग्य ठिकाणी ठेवल्यास सुख-समृद्धी वाढते, अशी मान्यता आहे.

पितरांचे फोटो लावताना काळजी घ्या

घरात पूर्वजांचे फोटो लावण्यापूर्वी वास्तुशास्त्रातील काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे मानले जाते.

देवघरात फोटो लावू नका

पितरांचे फोटो घरातील देवघरात किंवा देवघराच्या भिंतीवर लावणे योग्य मानले जात नाही.

पूजेचे फळ मिळत नाही?

वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, देवघरात पितरांचे फोटो ठेवल्यास देवी-देवतांची पूजा आणि पितरांचे स्मरण यांची जागा एकत्र होऊ नये, असे मानले जाते.

पूर्व दिशेला फोटो लावणे टाळा

पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला पितरांचे फोटो लावणे शुभ मानले जात नाही, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

घराच्या ब्रह्मस्थानी फोटो नको

घराच्या अगदी मध्यभागी म्हणजेच ब्रह्मस्थानी पितरांचे फोटो लावणे टाळावे, असे वास्तुशास्त्र सांगते.

दक्षिण-पश्चिम दिशा मानली जाते योग्य

घरातील हॉलमध्ये दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशेच्या भिंतीवर पितरांचे फोटो लावणे शुभ मानले जाते.

फोटो स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे

पितरांच्या फोटोवर धूळ, माती किंवा कोळ्याचे जाळे साचू देऊ नये. फोटो नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावेत.

ही माहिती मान्यतेवर आधारित

वरील माहिती वास्तुशास्त्रातील मान्यता, धार्मिक परंपरा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. कोणतीही गोष्ट आचरणात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.