Vastu Shastra Tips: घराची 'ही' दिशा असते अत्यंत शुभ; तिथे 'या' वस्तू ठेवू नका
पुढारी वृत्तसेवा
वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक दिशेला विशेष महत्त्व असते, मात्र यात ईशान्य कोपरा सर्वाधिक पवित्र मानला जातो.
हा कोपरा सकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असल्याने तिथे सुख, शांती आणि समृद्धीचा वास असतो. मात्र, याच कोपऱ्यात केलेल्या काही लहान चुका घरातील वातावरण बिघडवू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशा जेथे एकत्र येतात, त्या कोपऱ्याला 'ईशान कोण' असे म्हणतात. या दिशेला देवाचे स्थान मानले जाते.
याच दिशेतून घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवेश होतो. त्यामुळे हा भाग नेहमी स्वच्छ, मोकळा आणि हलका ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
ईशान्य कोपऱ्यात कधीही शौचालय किंवा बाथरूम नसावे. असे असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
या दिशेला जड फर्निचर, कपाटे किंवा अडगळीची खोली बांधणे टाळावे. यामुळे ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात.
किचनसाठी आग्नेय दिशा सर्वोत्तम मानली जाते. ईशान्य कोपऱ्यात स्वयंपाकघर असल्यास घरातील सदस्यांमध्ये वाद आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
या ठिकाणी कचरा किंवा भंगार साठवून ठेवू नका. घाण आणि अस्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन नकारात्मकता वाढू लागते.
विशेषतः विवाहित जोडप्यांनी या कोपऱ्यात बेडरूम बनवू नये. यामुळे नात्यात तणाव आणि मानसिक अशांती निर्माण होण्याची शक्यता असते.
ईशान्य कोपरा हा अध्यात्मिक कार्यांसाठी सर्वात शुभ मानला जातो. या ठिकाणी देवघर किंवा ध्यान धारणा करण्यासाठी जागा केल्यास घरात कायम प्रसन्नता आणि सुख-शांती लाभते, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.