Vastu Tips: नवीन घर घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

पुढारी वृत्तसेवा

घर खरेदी करणे एक मोठे स्वप्न असते. यासाठी लोक आयुष्यभर कष्ट करतात. एकदा स्वप्न साकार झाले की, घरात सुख आणि शांती नांदावी अशी इच्छा असते; मात्र, अनेकदा नवीन घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते.

याचा परिणाम सुख, शांती, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्यावर होतो. म्हणूनच, नवीन घर खरेदी करताना वास्तूशास्त्राच्या तत्त्वांची माहिती असणे हिताचे ठरते.

वास्तूशास्त्रानुसार, घरातील वास्तू दोष आणि नकारात्मक ऊर्जेमुळे जीवनात विविध आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून, नवीन घर खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

वास्तूशास्त्रानुसार, मुख्य प्रवेशद्वारासाठी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशा शुभ मानल्या जातात. या दिशांना मुख्य प्रवेशद्वार असल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच, मुख्य दरवाजा नेहमी आतल्या बाजूला उघडेल याची खात्री करा.

स्वयंपाकघरासाठी आग्नेय दिशा शुभ मानली जाते. या दिशेला अग्नीचा कोपरा म्हटले जाते आणि हे स्थान अग्नी तत्त्वाचे मानले जाते.

non stick.jpg

वास्तूशास्त्रानुसार, बाल्कनीसाठी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशा आदर्श मानल्या जातात. या दिशांना बाल्कनी असल्यास मानसिक शांती मिळते आणि आर्थिक प्रगतीस मदत होते.

पूजाघरासाठी ईशान्य दिशा अत्यंत पवित्र मानली जाते. येथे पूजाघर असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि उपासकाला पूजेचे पूर्ण आध्यात्मिक फळ मिळते.

Pooja Tips | File Photo

स्नानगृह घराच्या पश्चिम किंवा वायव्य दिशेला असावे, कारण नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी या दिशा सर्वोत्तम मानल्या जातात.

Vastu Tips Bathroom Mirror

नवीन घर खरेदी करताना, पायऱ्या नैऋत्य दिशेला असतील याची खात्री करा. चुकीच्या दिशेला पायऱ्या असल्यास घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.