पुढारी वृत्तसेवा
बॅगेतील वस्तूंचा मुलांवर परिणाम
वास्तुशास्त्रानुसार शाळेच्या बॅगेतील वस्तू मुलांच्या मनावर आणि अभ्यासाच्या सवयींवर प्रभाव टाकू शकतात.
तुटलेल्या पेन्सिल-पेन काढून टाका
तुटलेले पेन किंवा पेन्सिल बॅगेत ठेवू नका. यामुळे एकाग्रता कमी होऊन मनात गोंधळ वाढतो, असे मानले जाते.
फाटलेल्या वह्या-पुस्तके काढून टाका
फाटलेल्या वह्या, जुने नोट्स आणि निरुपयोगी कागद बॅगेत साठवू नयेत. त्यामुळे अव्यवस्था वाढते.
अनावश्यक कागदांचा ढीग टाळा
जुन्या चिठ्ठ्या, वापर नसलेले प्रोजेक्ट पेपर्स किंवा रद्दी कागद नियमितपणे काढून टाका.
धारदार वस्तू उघड्या ठेवू नका
कात्री, कटर किंवा कंपाससारख्या वस्तू नेहमी पाउच किंवा बॉक्समध्ये सुरक्षित ठेवा.
चॉकलेट-चिप्सचे रिकामे रॅपर्स काढा
रिकामे रॅपर्स बॅगेत साचल्याने घाण वाढते आणि बॅग अस्ताव्यस्त दिसते.
नकारात्मक चित्रे टाळा
भितीदायक किंवा नकारात्मक संदेश देणारे स्टिकर्स, चित्रे किंवा डिझाइन असलेल्या वस्तू बॅगेत ठेवू नका.
सकारात्मक रंग आणि डिझाइन निवडा
आनंदी, प्रेरणादायी आणि आकर्षक रंगांच्या शालेय वस्तू मुलांमध्ये सकारात्मकता निर्माण करतात.
मोरपिस किंवा चंदनाचा तुकडा ठेवा
वास्तुशास्त्रानुसार बॅगेत एक मोरपिस किंवा चंदनाचा छोटा तुकडा ठेवल्यास सकारात्मक वातावरण टिकून राहते, असे मानले जाते.
वरील माहिती धार्मिक श्रद्धा आणि समजुतींवर आधारित आहे. वाचकांंपर्यंत माहिती पोहोचविणे इतकाच हेतू आहे.