पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे रोप आढळते, कारण या रोपात माता लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.
पूजा-अर्चा आणि धार्मिक विधींमध्ये तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, तुळशीची पाने तोडण्यासंबंधी वास्तुशास्त्र आणि शास्त्रात काही कडक नियम सांगितले आहेत.
आठवड्यातील रविवार हा तुळशीची पाने तोडण्यासाठी अशुभ दिवस मानला जातो. या दिवशी पाने तोडल्यास आर्थिक स्थिती बिघडू शकते आणि घरात नकारात्मकता वाढू शकते.
हिंदू पंचांगानुसार येणाऱ्या एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडू नयेत. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असून, तुळस ही त्यांची प्रिय मानली जाते.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या काळात तुळशीची पाने तोडणे टाळावे.
असे मानले जाते की, या विशिष्ट दिवशी तुळशीची पाने तोडल्यास माता लक्ष्मी नाराज होतात, ज्यामुळे कुटुंबाच्या सुख-समृद्धीवर आणि आर्थिक स्थितीवर थेट परिणाम होतो.
सूर्य मावळल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुळशीची पाने तोडू नयेत.
तुळशीच्या रोपाला किंवा पानांना कधीही अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नये.
ही माहिती धार्मिक मान्यता, परंपरा आणि ग्रंथ यावरून दिली आहे. अधिक माहितीसाठी, कृपया वास्तुशास्त्र तज्ञांचा सल्ला घ्या.