Namdev Gharal
''व्हॅलेस ब्लॅकनोज शिप' (Valais Blacknose Sheep) ही मेंढी जगातील सर्वात क्युट आणि हुबेहूब खेळण्यातील 'टेडी बिअर'सारखी दिसते
Valais Blacknose Sheep या मेंढीचे मूळ स्थान स्वित्झर्लंड (Switzerland) देशातील 'व्हॅलेस' (Valais) हा पर्वतीय भाग आहे. म्हणूनच तिला 'व्हॅलेस ब्लॅकनोज' असे नाव पडले आहे.
ही मेंढी इंटरनेटवर सर्वात क्यूट मेंढी ठरली आहे कारण हीचा चेहरा, पांढरी शुभ्र लोकर, हे टेडीबिअर सारख्या बाहूलीसारखी दिसते
या मेंढीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा चेहरा, नाक, कान आणि डोळे पूर्णपणे गडद काळ्या रंगाचे असतात. तर तिचे संपूर्ण शरीर पांढऱ्याशुभ्र लोकरीने (Wool) झाकलेले असते. म्हणून तीला ब्लॅकनोज म्हणतात
केवळ चेहऱ्यावरच नाही, तर या मेंढीच्या गुडघ्यांवर आणि घोट्यांवरही काळ्या रंगाचे पॅचेस असतात. लांबून पाहताना तिने काळे बूट घातल्यासारखे वाटते.
सुरुवातीला ही फक्त स्वित्झर्लंडच्या आल्प्स (Alps) पर्वतांवर पाळली जायची. पण आता तिच्या क्युटनेसमुळे ब्रिटन, अमेरिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाळली जात आहे.
या मेंढ्यांचे शरीर अत्यंत दाट आणि कुरळ्या (Curly) लोकरीने भरलेले असते. हिवाळ्यात बर्फाळ प्रदेशातील कडक थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी निसर्गाने त्यांना हे जाड कवच दिले आहे.
या मेंढ्यांच्या डोक्यावर सुंदर, पिळदार शिंगे असतात. गमतीची गोष्ट म्हणजे नर (Ram) आणि मादी (Ewe) या दोघांनाही अशी वैशिष्ट्यपूर्ण शिंगे असतात.
हा प्राणी स्वभावाने अतिशय शांत, लाजाळू आणि माणसाळलेला असतो. स्वित्झर्लंडमध्ये लोक या मेंढ्यांना केवळ शेतीसाठी नाही तर अगदी घरातील कुत्र्या-मांजरांसारखे 'पाळीव प्राणी' म्हणून आवडीने पाळतात.
या मेंढ्या खूप कणखर असतात. आल्प्स पर्वतावरील अत्यंत खडकाळ, उंच आणि बर्फाच्छादित भागात सहज चढणे आणि तिथे राहणे त्यांना सहज जमते.
आपल्या टेडी बिअरसारख्या लूकमुळे ही मेंढी सोशल मीडियावर जगभर प्रचंड व्हायरल झाली आहे. हिला जगातील 'सर्वात क्युट मेंढी'चा दर्जा मिळाला आहे!
पूर्ण वाढ झालेल्या नराचे ram वजन साधारणपणे ८० ते १३० किलोग्रॅम पर्यंत असू शकते. तर पूर्ण वाढ झालेल्या मादीचे वजन साधारणपणे ७० ते ९० किलोग्रॅम च्या दरम्यान असते.