Vaibhav Sooryavanshi : दणादण सिक्स मारणारा वैभव सूर्यवंशी खातो तरी काय?

पुढारी वृत्तसेवा

IPL मध्ये आपल्या फटकेबाजीने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. मैदानावरील त्याच्या या ताकदीमागे आहे एक शिस्तबद्ध आहार

वैभवने २०२५ मध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींत मोठा बदल केला. त्याने मटण आणि पिझ्झासारख्या जंक फूडला पूर्णपणे 'बाय-बाय' केला आहे.

तुम्हाला माहीत आहे का? यावर्षी फेब्रुवारीपासून वैभव पूर्णपणे 'शाकाहारी' झाला आहे. आरोग्याला प्राधान्य देत त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे.

शाकाहारी आहारामुळे वैभवला मैदानावर खेळल्यानंतर शरीर लवकर 'रिकव्हर' करण्यास मदत होते, असे त्याचे मत आहे. यामुळे त्याचा स्टॅमिनाही कायम राहतो.

स्नायूंच्या बळकटीसाठी वैभव आपल्या आहारात डाळ, पनीर, दूध, ताक आणि दही यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश आवर्जून करतो.

मैदानावर दणादण सिक्स मारण्यासाठी लागणारी ऊर्जा त्याला 'ब्राऊन राईस', ओट्स, रताळे आणि तृणधान्यांच्या (गहू, बाजरी, नाचणी) चपातीतून मिळते.

वैभवच्या आहारात पालक, ब्रोकोली आणि इतर हिरव्या पालेभाज्यांना विशेष स्थान आहे. पोषणमूल्यांसाठी तो या भाज्यांना नेहमी प्राधान्य देतो.

गोड खाण्याऐवजी वैभव नैसर्गिक साखरेसाठी सफरचंद, केळी, संत्री यांसारखी फळे आणि आरोग्यासाठी उत्तम असलेला सुका मेवा खाणे पसंत करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.