पुढारी वृत्तसेवा
नकाशावर जगाचे शेवटचे टोक कुठे असेल, असा विचार केल्यास समोर येते ते म्हणजे अर्जेंटिनातील उशुआइया हे शहर.
या ठिकाणाला जगाचा शेवटचा किनारा म्हटले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या अगदी दक्षिणेला वसलेले हे शहर मानवी वस्तीची शेवटची सीमा मानली जाते.
उशुआइया ही टिएरा डेल फ्यूगो राज्याची राजधानी आहे.
येथून अंटार्क्टिका खंडाचे अंतर एक हजार किलोमीटर आहे. म्हणूनच याला अंटार्क्टिकाचे प्रवेशद्वार म्हणतात.
या शहराच्या पुढे पाऊल ठेवले की, मानवी कोलाहल संपतो आणि सुरू होते ते निसर्गाचा भयाण सन्नाटा आणि अथांग बर्फाळ वाळवंट.
येथे मुख्यत्वे स्पॅनिश भाषा बोलली जाते; मात्र पर्यटकांमुळे इंग्रजीचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. रंगीबेरंगी घरे आणि समोर पसरलेला निळा समुद्र असे विलोभनीय दृश्य येथे पाहायला मिळते.
येथील हवामान अतिशय थंड आणि आव्हानात्मक असते. मात्र जगाच्या टोकावर उभे राहण्याचा थरार अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येतात.