Ushnodaka : 'उष्णोदक' किंवा निव्वळ पाण्याचा काढा शरीरासाठी ठरतो ‘अमृत’

Namdev Gharal

रोग निवारणासाठी आपण औषधी काढा घेत असतो. पण आर्युवेदानुसार निव्वळ पाण्याचा काढा खूप शरीरासाठी अत्यंत प्रभावी व हलका पाचक मानला जातो. आर्युवेदात याला अमृतासमान म्हटले आहे

आयुर्वेदात केवळ पाणी विशिष्ट प्रमाणात उकळून व आटवून तयार केलेल्या पाण्याला 'उष्णोदक' (Ushnodaka) म्हणतात. पाणी किती प्रमाणात आटवले जाते, त्यानुसार त्याचे वेगवेगळे गुणधर्म आणि फायदे असतात.

यामध्ये १/८ पाणी शिल्लक ठेवणे (अष्टमांश शेष): तीव्र ताप, भूक मंदावणे, आणि शरीरातील तीव्र कफ-वात दोषांवर हे पाणी रामबाण ठरते.

१/४ पाणी शिल्लक ठेवणे (चतुर्थांश शेष): पाणी १/४ भाग उरेपर्यंत आटवून कोमट पिणे हे पचनक्रिया सुधारण्यासाठी, गॅस, पोटफुगी आणि अपचन दूर करण्यासाठी उत्तम मानले जाते

१/२ पाणी शिल्लक ठेवणे (अर्धांश शेष): पाणी निम्मे होईपर्यंत उकळणे. हे शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) संतुलित ठेवण्यास मदत करते आणि शरीराची नैसर्गिक स्वच्छता (डिटॉक्स) करते

यासह दररोज हे पाणी पिल्यास मंद झालेली पचनशक्ती सुधारण्यासाठी खूप मदत होते, अपचनामुळे पोटात तयार झालेले विषारी घटक (आमदोष) पचवून शरीराबाहेर काढण्यास मदत करते.

वजन नियंत्रण व चयापचय: कोमट आटवलेले पाणी नियमित प्यायल्यास मेटाबॉलिझम वाढतो आणि चरबी कमी होण्यास मदत होते

घसा व छातीचे विकार यासाठी खूप उपयुक्त ठरते सर्दी, खोकला, कफ आणि दमा या विकारांमध्ये श्वसनमार्ग मोकळा ठेवण्याचे काम या उष्मोदकामुळे होते

हे पाणी नेहमी ताजे करून प्यावे. एकदा थंड झालेले आटवलेले पाणी पुन्हा पुन्हा गरम करून पिऊ नये,असे पाणी शिळे आणि पचायला जड मानले जाते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

जटायूचा महाकाय पुतळा