Urmila Nimbalkar Bali Photoshoot : उर्मिलाच्या सौंदर्याचा नवा नजराणा! बालीमध्ये रंगला अद्भुत सोहळा

पुढारी वृत्तसेवा

कामाच्या व्यापातून वेळ काढत लोकप्रिय अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर सध्या बालीच्या निसर्गरम्य बेटावर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

बालीतील अप्रतिम लोकेशनवर उर्मिलाने केलेल्या फोटोशूटने सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घातला असून, तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

'Urmila Nimbalkar Bali photos

प्रत्येक फोटोमध्ये उर्मिलाचा एक वेगळा आणि स्टायलिश लूक दिसून येत आहे, ज्याने फॅशन प्रेमींच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत.

बालीचा हिरवागार निसर्ग आणि अथांग पसरलेला निळाशार समुद्र... या पार्श्वभूमीवर उर्मिलाचे सौंदर्य एखाद्या सिनेमॅटिक सीनसारखे भासत आहे.

उर्मिलाने या ट्रिपसाठी निवडलेले खास आउटफिट्स आणि तिचा क्लासी लूक सध्या नेटिझन्ससाठी 'मेजर फॅशन गोल्स' ठरत आहे.

केवळ फोटोच नाहीत, तर उर्मिला आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बालीची सफर चाहत्यांसाठी एका विशेष 'ट्रॅव्हल डायरी'च्या रूपात मांडत आहे.

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला असून, "कायमच ग्लॅमरस!" अशा प्रतिक्रियांचा ओघ सुरू आहे.

सततच्या कामातून हा छोटासा ब्रेक उर्मिलासाठी रिचार्जिंग ठरला असून, ती आता नवीन प्रोजेक्ट्ससाठी दुप्पट ऊर्जेसह सज्ज होत आहे.