पुढारी वृत्तसेवा
स्मार्टफोनवरून रोख रक्कम काढणे आता आणखी सोपे होणार आहे.
आता एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. एका स्कॅनवर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून पैसे काढू शकता.
UPI द्वारे आतापर्यंत तुम्ही फक्त पैसे पाठवणे किंवा ऑनलाइन खरेदी करत होता, पण आता UPI चा वापर रोख रक्कम काढण्यासाठीही केला जाणार आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आता क्यूआर कोड स्कॅन करून रोख रक्कम काढण्याची सुविधा सुरू करणार आहे.
किराणा दुकाने किंवा छोट्या सेवा केंद्रांवरही ही सुविधा मिळेल. फक्त क्यूआर कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा.
ग्राहक क्यूआर कोड स्कॅन करेल. त्याच्या खात्यातून पैसे डेबिट होतील आणि दुकानदाराच्या खात्यात जमा होतील. दुकानदार लगेच तुम्हाला रोख रक्कम देईल.
सध्या यूपीआयद्वारे रोख रक्कम काढण्याची सोय काही निवडक एटीएमवरच उपलब्ध आहे.
यावर मर्यादा देखील आहेत. शहरांमध्ये प्रति व्यवहार 1,000 रू. पर्यंत तर ग्रामीण भागात 2,000 रू. पर्यंत रोख रक्कम काढता येते.
पण, आता ही सुविधा लाखो दुकानांवर उपलब्ध होणार आहे.
या नव्या सुविधेमुळे दुर्गम भागांतील लोकांनाही बँकिंग सेवा मिळवणे सोपे होईल.