Namdev Gharal
भारत हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आता युनेस्कोने नुकतीच यातील सात सुंदर निसर्ग संपन्न स्थळे जागतिक वारसास्थळाच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केली आहेत, आता भारतात एकूण ६९ जागतिक वारसास्थळे झाली आहेत.
दख्खन ट्रॅप्स, महाबळेश्वर- पाचगणी
हे एक विस्तीर्ण ज्वालामुखी पठार आहे, जिथे प्राचीन बेसॉल्ट प्रवाह, भव्य कडे आणि अद्वितीय वनस्पती व प्राणीजीवन आहे. पृथ्वीचा भूवैज्ञानिक इतिहास आणि जैवविविधता समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
सेंट मेरी बेट - उडुपी, कर्नाटक
सेंट मेरी बेट समूह हा एक असा गट आहे जिथे वैशिष्ट्यपूर्ण षटकोनी बेसॉल्ट स्तंभ, किनारी असामान्य नैसर्गिक रचना आहेत, ज्या भूवैज्ञानिकदृष्ट्या दुर्मिळ आणि आकर्षक आहेत.
मेघालयीन गुहा ( मेघालय)
या गुहा प्रणाली मेघालयीन भूवैज्ञानिक युगातील खनिज साठे आणि रचना जतन करतात, तसेच भूतकाळातील हवामान, जैवविविधता आणि भूवैज्ञानिक उत्क्रांतीची नोंद देतात.
नागा हिल ओफिओलाइट (नागालँड)
हे ठिकाण नागालँडच्या प्रादेशिक भूतकाळाशी जोडलेले आहे. या डोंगरावरील रासायनिक बदल खनिज साठ्यांबद्दल माहिती देतो.
तिरुमला टेकड्या तिरुपती
या पवित्र टेकड्या आहेत, ज्यात अद्वितीय भूदृश्ये, आध्यात्मिक महत्त्व, वन परिसंस्था, औषधी वनस्पती आणि निसर्ग संवर्धनाशी निगडित अभियान याच्याशी जोडल्या आहेत.
एर्रा मट्टी दिब्बलू, विशाखापट्टणम,
या ठिकाणी भूवैज्ञानिक रचना तयार करणारे किनारी लाल वाळूचे जीवाश्म, सागरी पक्ष्यांची जैवविविधता आणि झिजलेली भूरूपे आहेत. हे ठिकाण दिसायला अत्यंत आकर्षक आहे.
वर्काला, केरळचा नैसर्गिक वारसा
केरळमधील या स्थळामध्ये किनारी कड्यांच्या रचना, झरे, खनिजयुक्त माती आणि किनारी परिसंस्था यांचा समावेश आहे. येथील निसर्गरम्य कडे अद्वितीय आहेत.