पुढारी वृत्तसेवा
आसामच्या उमा छेत्रीने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. ती आसामची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.
नवी मुंबईत बांगलादेशविरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यात तिला पदार्पणाची कॅप मिळाली.
रितू ध्रुब (२०१३-२०१४) नंतर भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती आसामची दुसरी खेळाडू आहे.
एकदिवसीय पदार्पणापूर्वी उमाने भारतासाठी ७ टी-२० सामने खेळले आहेत.
२०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या भारतीय संघात तिचा समावेश होता.
उमाने UP वॉरियर्झकडून WPL मध्ये २०२३ मध्ये पदार्पण केलं. दुसऱ्या हंगामात ती ८ सामन्यांत ८० धावा करून संघाची महत्त्वाची बॅटर ठरली.
"तू कॅम्पमधील सर्वाधिक मेहनत करणाऱ्या मुलींपैकी एक आहेस," असे स्मृती मानधनाने कॅप देताना म्हटले.
"तुझा फिटनेस आणि ॲथलेटिझम आम्हाला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरित करतो," असे स्मृती म्हणाली.
असममधील या तरुणीने मेहनत, फिटनेस आणि जिद्दीचं उत्तम उदाहरण साकारलं आहे.