Namdev Gharal
आफ्रिका खंडातील नायजेरिया या देशात एक शहर असे आहे ज्याला जगाची जुळ्यांची राजधानी Twin Capital of the World म्हटले जाते हे शहर म्हणजे 'इग्बो-ओरा' (Igbo-Ora)
सर्वसामान्यपणे असे आढळून येते की जगभरात सरासरी दर १,००० जन्मांमागे साधारण १२ जुळ्या मुलांचा जन्म होतो. परंतु इग्बो-ओरा शहरामध्ये हे प्रमाण दर १,००० जन्मांमागे तब्बल ४५ ते ५० जुळ्या जोड्या इतके प्रचंड आहे.
यामुळे या शहरात प्रत्येक कुटुंबात जुळी मुले आहेत: या गावाची लोकसंख्या सुमारे २ लाख असून, इथल्या जवळपास प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी जुळ्यांची जोडी आढळते.
स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, इथल्या महिला 'अमला' (Amala) नावाचे अन्न आणि Yam चे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. यातील बहुतांश जुळी योरुबा जमातीत आढळतात
काही संशोधकांच्या मते, या रताळ्यांच्या yam सालीमध्ये 'फायटोइस्ट्रोजेन' नावाचे नैसर्गिक रसायन असते, ज्यामुळे महिलांच्या अंडाशयातून एकाच वेळी दोन अंडी बाहेर पडण्याची शक्यता वाढते.
वैज्ञानिक अभ्यासानुसार, या भागातील 'योरुबा' (Yoruba) जमातीमध्ये जुळी मुले होण्याचे जनुकीय गुणधर्म खूप जास्त आहेत. पिढ्यानपिढ्या एकाच समाजात लग्ने झाल्यामुळे हे जनुक या शहरात टिकून राहिले आहे.
या संस्कृतीत जुळ्या मुलांना देवाचा वरदान मानले जाते. जन्माला येणाऱ्या पहिल्या जुळ्या बाळाला 'ताइवो' (Taiwo) ( जगाची पाहणी करायला आधी आलेला) आणि दुसऱ्या बाळाला 'केहिंदे' (Kehinde) ( मागाहून आलेला) हेच नाव दिले जाते.
World Twins Festival: दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात इग्बो-ओरामध्ये एक मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात देशभरातून आणि परदेशातून हजारो जुळ्या जोड्या एकत्र येतात आणि एकाच प्रकारचे कपडे घालून उत्सव साजरा करतात.
भारतामध्ये सुद्धा केरळ राज्यातील 'कोडिन्ही' या गावाला 'Twin Capital of India' म्हणून ओळखले जाते, कारण तेथेही असामान्यपणे जुळ्या मुलांचे प्रमाण खूप जास्त आहे.