पुढारी वृत्तसेवा
जगभरात असे अनेक देश आहेत, जे केवळ त्यांच्या संस्कृती किंवा नैसर्गिक सौंदर्यासाठीच नव्हे तर त्यांच्या अद्वितीय कायद्यांसाठीही ओळखले जातात.
आपणास माहिती आहे का, की या जगात असा एक देशही आहे, जिथे लोक रस्त्यावर फक्त कार चालवतात.
हा देश आहे तुर्कमेनिस्तान.
याचे राजधानी शहर अश्गाबातमध्ये 2018 मध्ये असा नियम लागू झाला की, फक्त पांढऱ्या किंवा पांढऱ्यासारख्या हलक्या रंगांच्या कार रस्त्यावर चालवल्या जाऊ शकतात.
तिथे तुम्हाला कार खरेदी करण्यापूर्वी तिचा रंग विचारात घ्यावा लागतो. कारण रस्त्यावर फक्त पांढऱ्या गाड्यांनाच परवानगी आहे.
या देशाची राजधानी जगभरात पांढऱ्या संगमरवराचे शहर म्हणून ओळखली जाते.
इमारती, पदपथ, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक जागांपासून जवळजवळ प्रत्येक बांधकामात वापरल्या जाणाऱ्या चमकदार पांढऱ्या संगमरवरामुळे या दगडांवर पडणारा सूर्यप्रकाश संपूर्ण परिसर प्रकाशित करतो.
दिवस असो वा संध्याकाळ, हे शहर प्रकाशाने उजळलेले दिसते. या तेजस्वी देखाव्यामुळेच जगातील सर्वात चैतन्यशील आणि अद्वितीय शहरांपैकी एक म्हणून या शहराला मान्यता मिळाली आहे.
हे ठिकाण केवळ सौंदर्याच्या बाबतीतच नाही तर किमतीच्या बाबतीतही जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक मानले जाते.