Namdev Gharal
तुर्कस्तानात मिळणारे हे (turkish maras ice cream) आईस्क्रिम हे इतके घट्ट व चिकट असते हे कापण्यासाठी धारधार सुरी किंवा सत्तूर वापरावा लागतो
हे आईस्क्रिम हे जंगली ऑर्किडच्या कंदांपासून(Salep) मिळणाऱ्या पावडरीपासून बनते. ही सामग्री आईस्क्रीमला लवचिक, घट्ट आणि चिवटपणा देते.
हे भूमध्य समुद्रातील झाड (जंगली ऑर्किड) मिळणारे नैसर्गिक गोंद (Mastic)आहे. यामुळे आईस्क्रीमला विशेष चव आणि सुगंध येतो
हे आईस्क्रिम तयार करण्यासाठी प्रामुख्याने शेळीचे दूध (Goat milk) वापरले जाते. त्यामुळे आईस्क्रीमची चव क्रीमी लागते. तसेच आईस्क्रिमला घट्टपणा येतो. तसेच गोडव्या साठी साखर वापरली जाते
गरम हवामानातही हे आईस्क्रीम पटकन वितळत नाही. म्हणूनच इस्तंबूलसारख्या पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी हे खास आकर्षण आहे.
यात व्हॅनिला, पिस्ता, चॉकलेट, स्ट्रॉबेरी असे फ्लेवर्स मिळतात, पण पारंपरिक ओरिजनल चव ही नेहमीच जास्त घट्ट व रिच असते.
त्याचबरोर तुर्कीश आईस्क्रीम विक्रेते खास लांब चमच्यांनी खेळवत, उलट-सुलट करून, कधी ग्राहकाच्या हातात द्यायचे नाटक करून, तर कधी परत खेचून – अशी मजेदार करामत करतात
सामान्य आईस्क्रीम लवकर वितळते, पण Maras आईस्क्रीम उशिरा वितळते. तसेच विक्रेते हे आईस्क्रीम खेळवत, ओढत-ताणत ग्राहकांना देतात – ती पाहण्याची मजा वेगळीच असते.