Tulsi Vivah Rules: तुळशी विवाहाच्या दिवशी 'या' गोष्टी करू नका?

पुढारी वृत्तसेवा

दिपोत्सवाची खरी सांगता तुलसी विवाहाने होते. घरोघरी तुलसीच्या विवाहाच्या तयारीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी ऊसाचे मंडप सजणार असून मंगलाष्टकांचे सूर गुंजणार आहेत.

सर्वसाधारणपणे दिवाळी संपली की, तुलसी विवाहाचे वेध लागतात. जुन्या जानकारांच्यामते वसुबारसेपासून सुरु झालेली दिवाळी तुलसी विवाहापर्यंत असते. 

त्यामुळे घरोघरी तुलसीच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. तुलसी वृंदावनाच्या रंगरंगोटीपासून विवाहासाठी भटजी बुक करण्यापर्यंत सर्व तयारी केली जात आहे. दरम्यान, या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते लक्षात ठेवा.

तुलसीची पाने तोडू नका

'तुलसी विवाहा'च्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेसाठी आवश्यक असलेली पाने आधीच तोडून ठेवावीत.

तुळशीच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा

या दिवशी तुळशीच्या रोपाभोवती स्वच्छता राखा; तिथे कोणताही कचरा किंवा अस्वच्छता साचू देऊ नका.

मांसाहार आणि मद्यपान टाळा

'तुलसी विवाहा'च्या दिवशी मांसाहार, मद्यपान आणि तामसिक अन्नाचे सेवन करणे टाळावे.

तुळशीला सजवायला विसरू नका

पूजेपूर्वी तुळशीच्या रोपाला लाल चुनरी, फुले आणि फुलांच्या माळांनी सजवा, तसेच इतर पारंपरिक अलंकारांनी सुशोभित करा.