पुढारी वृत्तसेवा
तुळशीचा काढा (Holy Basil/Tulsi, Ocimum tenuiflorum) हा पारंपरिक भारतीय घरगुती उपाय आहे
तुळशीचा काढा गरम असल्यामुळे घशाला आराम मिळू शकतो तुळशीमध्ये दाह-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात
काही मानवी अभ्यासांमध्ये तुळशीच्या अर्कामुळे ताण, चिंता आणि काही मानसिक कार्यक्षमतेशी संबंधित मोजमापांमध्ये सुधारणा दिसून आली आहे
तुळशीमुळे glucose regulation मध्ये काही फायदा होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यासाठी तुळस काढा फायदेशीर ठरू शकतो
तुळस अर्काच्या अभ्यासांमध्ये रक्तदाब आणि lipid profile यांसारख्या घटकांमध्ये सुधारणा दिसल्याचे systematic reviewमध्ये नमूद केले आहे
30 दिवस तुळशीचा अर्क घेतलेल्या निरोगी प्रौढांमध्ये काही cognitive tests मध्ये placebo च्या तुलनेत सुधारणा दिसून आल्याने हा परिणाम आशादायक आहे
तुळशीचा काढा आरोग्यदायी पेय म्हणून योग्य प्रमाणात घेतला तर शारीरिक व्याधींसाठी उपयोगी ठरू शकतो
double-blind randomized study मध्ये तुळशीच्या अर्कामुळे काही immune markers मध्ये बदल दिसले. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढून संसर्ग होण्यापासून बचाव होतो
मधुमेहाची, रक्तदाबाची, रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास तुळस काढा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा