डासांपासून सुटका हवी आहे? करा 'हे' ५ घरगुती उपाय, डास होतील हद्दपार

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात डासांचा त्रास वाढतो, 'या' घरगुती उपायांनी डासांना करा हद्दपार.

उन्हाळ्यात लोक उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त असतातच, पण या ऋतूमध्ये डासांचा त्रासही मोठ्या प्रमाणात वाढतो.

डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. काही सोप्या घरगुती उपायांनी डासांपासून सहज सुटका मिळवू शकता.

डासांपासून बचाव करण्यासाठी अनेकजण घरात कॉइल किंवा केमिकलयुक्त स्प्रे वापरतात. मात्र हे स्प्रे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

त्यामुळे डासांना दूर ठेवण्यासाठी काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

कडूलिंब आणि कापूर

कडूलिंबाच्या तेलात थोडासा कापूर मिसळून तो दिव्यासारखा पेटवा. त्यातून निघणारा धूर डासांना घरातून पळवून लावण्यास मदत करतो.

लिंबू आणि लवंग

एक लिंबू अर्धा कापा आणि त्यात 10-12 लवंगा खोचा. हे लिंबू खोलीच्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ ठेवा. त्याचा सुगंध डासांसाठी नैसर्गिक रिपेलेंटसारखा काम करतो.

घरात लावा काही खास झाडे

घरात तुळशीचे रोप लावल्यास डास जवळ येत नाहीत. तसेच लेमनग्रास आणि सिट्रोनेला ही झाडे देखील डासांना दूर ठेवण्यात प्रभावी ठरतात.

लसूण स्प्रे

लसूणचा तीव्र वास डासांना सहन होत नाही. काही लसूण पाकळ्या कुटून पाण्यात उकळा. हे पाणी स्प्रे बाटलीत भरून घराच्या कोपऱ्यांत, पडद्यांवर आणि दरवाज्याजवळ फवारणी करा.